बारामती आरटीओकडून
वाहनमालकांना आवाहन

बारामती आरटीओकडून वाहनमालकांना आवाहन

बारामती, ता. ५ : वाहनावरील कर्जाचा बोजा असलेली नोंद उतरविताना वित्तदात्याकडून वाहनमालकास नमुना क्र. ३५ व ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येते. अशा प्रकारे वित्तदात्याकडून जारी केले जाणारे नमुना क्र. ३५ व ना हरकत प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे काही प्रकरणात निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहन मालकांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या mh४२hptr@gmail.com या ई मेल आयडीवरून सत्यता पडताळणीसाठी ई मेल केला जाईल. त्याला ७ दिवसांत उत्तर द्यावे. मुदतीत उत्तर न आल्यास सादर केलेले नमुना क्र. ३५ व ना हरकत प्रमाणपत्र हे वाहनमालकाकडूनच जारी झाल्याचे समजण्यात येईल व वाहनावरील कर्जबोज्याची नोंद उतरविण्यात येईल. सर्व वाहन मालकांनी ना हरकत प्रमाणपत्राची पडताळणी ईमेलवर करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार पाटील यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com