पोलिसांच्या बँड पथकाने जिंकली बारामतीकरांची मने

पोलिसांच्या बँड पथकाने जिंकली बारामतीकरांची मने

बारामती, ता. ७ ः पोलिस स्थापना दिवसाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत पोलिस दलाच्या बँडने विविध गीते सादर करून बारामतीकरांची मने जिंकून घेतली. एक सारख्या गणवेशातील या पोलिस कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र गीतासह विविध धून बँडच्या तालावर वाजवत शहरातून केलेले संचलन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
दरवर्षी पोलिस स्थापना दिनाचे औचित्य साधून पुणे ग्रामीण पोलिस दलाचे बँड पथक नागरिकांसाठी काही गीतांचे सादरीकरण करते. बारामतीतील भिगवण चौकासह इंदापूर चौकात या बँड पथकाने विविध धून वाजवून बारामतीकरांचे लक्ष वेधून घेतले.
शौर्य तसेच देशभक्तिपर धून वाजविल्यानंतर बारामतीकरांनी उत्स्फूर्त दाद दिली. तासभर या बँडपथकाने विविध गीतांचे सादरीकरण केले.
पोलिस निरीक्षक सुनील महाडीक व वाहतूक पोलिस उप निरीक्षक जाधव यांनी जनतेला अभिवादन केले. अशा उपक्रमामुळे पोलिस आणि जनता संबंध वृद्धिंगत होण्यास मदत होणार असल्याचे महाडीक यांनी नमूद केले. कायम रस्त्यावर पोलिस कारवाई करतानाच दिसतात. परंतु, आज पोलिस बँडचे प्रदर्शन करून लोकांचे मनोरंजन सुद्धा पोलिसांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com