बारामतीतील गाळेधारक भाडेवाढीने नाराज

बारामतीतील गाळेधारक भाडेवाढीने नाराज

बारामती, ता. ८ : कोविडच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षात शहरातील गाळेधारक आर्थिक अडचणीत आहे. मात्र, नगरपालिकेने भाडेवाढ केल्याने गाळेधारकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, अडचणीच्या काळात भाडेवाढ केली आहे, असा आरोप गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र जाधव यांनी केला आहे.
याबाबत त्यांना दिलेल्या पत्रात नगरपालिकेने नमूद केले आहे की, गाळ्यांचे भाडे व भाडेवाढ त्रिसदस्यीय समिती निश्चित करते. या समितीने ठरविल्यानुसार वेळोवेळी लिलाव झालेल्या गाळ्यांच्या भाड्यात वाढ केली आहे. बारामतीत सन २०१३ व २०१६ मध्ये भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ रद्द करण्याबाबत नगरपालिका अधिनियमात तरतूद नाही.
दरम्यान, नगरपालिकेने पूर्वलक्षी प्रभावाने केलेली भाडेवाढ ३५ टक्क्यांइतकी असून, ती अवाजवी आहे. सन २०२० पासून पाच टक्के दरवर्षी यानुसार भाडेवाढ करायला हवी होती, तशी ती झालेली नाही. या शिवाय कोविडच्या काळात नगरपालिकेच्या गाळ्यांचे भाडे कमी करण्याबाबत अद्याप कोणताही शासन निर्णय झालेला नसल्याचे सांगत ही वाढ कमी करण्याबाबत नगरपालिकेने हात वर केले आहेत. नगरपालिका गाळ्यांमध्ये कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाहीत, हा विषय तहकूब असतानाही भाडेवाढ झाली आहे.
दरम्यान, नगरपालिकेने सन २०२० पासून पाच टक्के भाडेवाढ आकारावी, अशी गाळेधारक संघटनेची मागणी होती. या संदर्भात गाळेधारक असोसिएशनने उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरपालिकेकडे मागणी केली होती. ही भाडेवाढ या काळात करणे अयोग्य असल्याचे त्यांचे म्हणणे होते. प्रत्यक्षात त्यांना दिलासा देण्यास नगरपालिका प्रशासनाने असमर्थता दर्शविली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com