बारामती टेंपोच्या धडकेत
एकाचा मृत्यू, दोघे जखमी

बारामती टेंपोच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जखमी

बारामती, ता. ८ : भरधाव टेंपोची दोन दुचाकीवरील तिघांना धडक बसून झालेल्या अपघात एकाचा मृत्यू; तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ४ जानेवारी रोजी बारामती-पाटस रस्त्यावर बऱ्हाणपूर येथे हा अपघात झाला. त्यात इकबाल सय्यद अली हुसेन (रा. फलटण रोड, बारामती) यांचा मृत्यू झाला; तर विजय ज्ञानदेव जाधव (रा. पाटस रोड, बारामती) व नईम बन्सीलाल शेख (रा. पाहुणेवाडी, ता. बारामती) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी टेम्पोचालक सुनील नारायण मचाले (रा. केसनंद रोड, उंद्रे हॉस्पिटलजवळ, वाघोली, ता. हवेली) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विजय महादेव बनकर यांनी याबाबत फिर्याद दिली. नजिक ही घटना घडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com