बारामती येथे लसीकरणाचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती येथे लसीकरणाचे आवाहन
बारामती येथे लसीकरणाचे आवाहन

बारामती येथे लसीकरणाचे आवाहन

sakal_logo
By

बारामती, ता. १० : ‘‘देशात व राज्यातही अनेक ठिकाणी झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे,’’ असे आवाहन बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे.
ते म्हणाले, ‘‘मास्क, सॅनेटायझर व सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीसोबतच लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोन्ही ही लसी घेणे अनिवार्य आहे. अजूनही अनेकांनी लसीचा पहिला व ज्यांचा पहिला झाला आहे त्यांनी दुसरा डोस घेतलेला नाही. प्रामुख्याने दुसरा डोस प्रलंबित असलेल्यांची संख्या बारामती शहर व तालुक्यात अधिक आहे.’’
महिला शासकीय रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लस उपलब्ध आहे, या शिवाय १५ ते १८ वयोगटातील ज्या मुलांचे अद्यापही लसीकरण केलेले नाही, अशा मुलांचेही लसीकरण होण्यासाठी पालकांनी तातडीने मुलांना घेऊन लसीकरण केंद्रावर जावे, जी मुले शाळांमध्ये जात नाही, अशा शालाबाह्य मुलांचेही लसीकरण करून घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top