सिटी सेंट्रल मॉलमध्ये महाबचत ऑफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिटी सेंट्रल मॉलमध्ये महाबचत ऑफर
सिटी सेंट्रल मॉलमध्ये महाबचत ऑफर

सिटी सेंट्रल मॉलमध्ये महाबचत ऑफर

sakal_logo
By

बारामती, ता. ११ : येथील भिगवण रस्त्यावरील बारामती सहकारी बँकेनजिक असलेल्या सिटी सेंट्रल मॉलमध्ये मकरसंक्रांतीनिमित्त विविध वस्तूंवर आकर्षक ऑफर्स दिल्याची माहिती वैभव गांधी व ऋषभ गांधी यांनी दिली.
येथे संक्रांतीनिमित्त तिळगूळ, तिळवडी, तिळलाडू, रेवडी, लुटण्याचे वाण, स्टील व प्लॅस्टिक क्रोकरी भरपूर व्हरायटीत उपलब्ध आहेत. तसेच, ओवसा, तिळाचे दागिने तसेच बाळकृष्ण सेटही उपलब्ध आहेत. या शिवाय एक किलो तिळगूळ साठ रुपये, पांढरे तिळ १६० रुपये किलो, हरभरा डाळ ६८ रुपये किलो, काजू ७००; तर बदाम ६५० रुपये किलोने विक्री सुरु आहे.
गुड डे कॅश्यू बिस्कीट खरेदीत ग्राहकांची ४५ रुपयांची बचत होत असून, हा ६०० ग्रॅमचा पुडा अवघ्या ७५ रुपयांत विक्री होत आहे. पारलेच्या रस्क टोस्टवर तब्बल ५० टक्के सूट मिळत असून १६० रुपयांचा पुडा फक्त ८० रुपयात दिला जात आहे. पारले २०-२०, हाईड अँड सिक, न्यूट्रीकंच, हॅपी-हॅपी चोकोलश, डार्क फॅन्टसी यासह रामबंधू लोणचे व पापड यावर थेट ५० टक्के डिस्काउंट ऑफर आहे. रेडलेबल एक किलो चहावर १३५ रुपयांची सूट असून, बोर्नव्हिटावर ६० रुपयांची सूट आहे. डव, पॅन्टिन, हेड अँड शोल्डर, ट्रेसमी, वाटिका या शांपूवर देखील ५० टक्क्यांपर्यंत सूट आहे. विम लिक्वीडच्या ७५० ग्रॅमवर ५५ रुपये सूट आहे. किसान टोमॅटो केचअपच्या एक किलोच्या पॅकवर ३० रुपयांची सूट दिली आहे. लाओपालाच्या डिनरसेटवर ५० टक्के सूट दिली जात आहे.
सिटी सेंट्रल मॉलच्या एकाच दालनात कुटुंबासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू उपलब्ध असून, विविध डिस्काउंट ऑफर्समुळे येथे खरेदी करणे ही महाबचत ठरत आहे.
ssociated Media Ids : BMT२२B०४२३८

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top