शिष्यवृत्ती परिक्षेत बारामती तालुका अव्वल

शिष्यवृत्ती परिक्षेत बारामती तालुका अव्वल

बारामती, ता. १२ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात बारामतीच्या कै. ग. भि. देशपांडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. शहरी विभागातून बारामती तालुक्यातील पाचवी शिष्यवृत्ती प्राप्त ठरलेल्या सोळा विद्यार्थ्यांपैकी नऊ विद्यार्थी व आठवी शिष्यवृत्ती प्राप्त ठरलेल्या नऊ विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थी हे याच विद्यालयाचे आहेत. बारामती तालुका शहरी विभागातून पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत सृष्टी लोणकर तालुक्यात प्रथम आली आहे. आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत निशांत बेदमुथा हाही तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. या सर्व विद्यार्थ्यांना राज्य शासनाची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, शाळा समितीचे अध्यक्ष धनंजय खुर्जेकर, महामात्र गोविंद कुलकर्णी, शाळा समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी, सल्लागार समिती सदस्य राजीव देशपांडे, मुख्याध्यापक उमेद सय्यद यांनी अभिनंदन केले.

ईश्वरी कढणेचे नेत्रदीपक यश
तालुक्यातील काटेवाडी मधील ईश्वरी सुदाम कढणे या विद्यार्थिनीचा पाचवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यात ८३ वा क्रमांक तर तालुक्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. इयत्ता दुसरी पासूनच मंथन, ज्ञानांजन यांसारख्या परीक्षांमध्ये ईश्वरी हिने सहभाग नोंदवीत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. त्यामुळे तिला पाचवीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळवता आले. या यशानंतर छत्रपती हायस्कूल काटेवाडीचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com