रुई परिसरातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुई परिसरातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता
रुई परिसरातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

रुई परिसरातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

sakal_logo
By

बारामती, ता. ३१ : शहरातील रुई परिसरातून चौदा वर्षांची अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद देण्यात आली असून, पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. संबंधित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. ते कामावर गेल्यानंतर सर्वात लहान असलेली चौदा वर्षांची मुलगी घरात नसल्याचे निदर्शनास आले. अन्य मुलींना, ‘ती कुठे गेली आहे?’ अशी विचारणा केली असता ती दुपारी दोनच्या सुमारास, ‘केसांना लावण्यासाठी कोरफड घेऊन येते,’ असे सांगून घराबाहेर गेली ती परतलीच नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, फिर्यादीच्या शेजारी राहणारा एक संशयितसुद्धा त्याच दिवसापासून बेपत्ता झाला आहे. त्यानेच मुलीला फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top