कंपनीत गाडी लावतो सांगून फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंपनीत गाडी लावतो
सांगून फसवणूक
कंपनीत गाडी लावतो सांगून फसवणूक

कंपनीत गाडी लावतो सांगून फसवणूक

sakal_logo
By

बारामती, ता. ७ : कंपनीत गाडी भाडे तत्त्वावर लावून देतो, असे सांगून खोटे करारपत्र करून फसवणूक केल्याप्रकरणी ऋषिकेश गणेश वाघमारे (रा. मोरगाव, ता. बारामती) याच्या विरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिनीनाथ रमेश गायकवाड (रा. सूर्यनगरी, बारामती, मूळ रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) या खासगी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने याबाबत फिर्याद दिली. त्याकडे दोन गाड्या आहेत. त्यापैकी सुपर कॅरी या गाडीचा वापर ते माल वाहतुकीसाठी करतात. त्यांनी या गाडीसंबंधी फेसबुकवर वाहन चालविण्यासाठी द्यायचे असल्याची जाहिरात केली होती.
त्यावर दिलेल्या मोबाईलवर वाघमारे याने संपर्क केला. त्याने पीएमडी डेअरीमध्ये माझे कंत्राट असून, तेथे माझ्या सहा गाड्या सुरु आहेत, तेथे तुमची गाडी भाडोत्री लावतो. त्या बदल्यात तुम्हाला महिना 35 हजार रुपये देतो, असे सांगितले. त्याने दिलेले करारपत्र बोगस असल्याचे नंतर चौकशीत लक्षात आले. त्यानंतर फिर्यादीने पोलिसात तक्रार दाखल केली. बोगस करारपत्राच्या आधारे वाहने नेल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top