बारामतीतील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भोसले, गिरमे यांचा प्रथम क्रमांक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीतील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये
भोसले, गिरमे यांचा प्रथम क्रमांक
बारामतीतील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भोसले, गिरमे यांचा प्रथम क्रमांक

बारामतीतील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भोसले, गिरमे यांचा प्रथम क्रमांक

sakal_logo
By

बारामती, ता. ७ : शिवजयंतीनिमित्त दुर्गभ्रमंती सोशल फाउंडेशनच्यावतीने आयोजित केलेल्या शिव मॅरेथॉन स्पर्धेत मुलांच्या गटात संजय भोसले व मुलींच्या गटात धनशी गिरमे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
या मॅरेथॉनमध्ये पंचायत समिती चौक ते पेन्सील चौक व परत पंचायत समिती, असे मुलांसाठी सात किलोमीटर, तर मुलींसाठी पाच किलोमीटर अंतर स्पर्धेसाठी होते. मुलांच्या गटात रोहित भगत याने द्वितीय, तर अप्पा शिंदे याने तिसरा क्रमांक मिळविला. मुलींच्या गटात अपेक्षा कदम व योगिता वरे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. या मॅरेथॉनमध्ये चारशे स्पर्धकांनी सहभाग घेतला. संभाजी होळकर, सचिन सातव, अतुल बालगुडे, दादासाहेब कांबळे, हनुमंत पाटील, जगन्नाथ लकडे, सुनील मोटे आदी या प्रसंगी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील यांनी केले, चंदू लोंढे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top