वाल्हे तालुक्यातील अनुष्का प्रथम

वाल्हे तालुक्यातील अनुष्का प्रथम

वाल्हे, ता. १० : वाल्हे (ता. पुरंदर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मीकी विद्यालयातील अनुष्का अनिल चाचर या विद्यार्थ्यांचा इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत पुरंदर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आला. तर आठवीतील दोन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य मोहन वाघमारे यांनी दिली.
इयत्ता पाचवीतील अनुष्का अनिल चाचर हिने (२४८) गुण मिळवून तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तर इयत्ता आठवीमधील रैयान अरिफमहमद आतार (१८२), ईशा नितीन भुजबळ (१६०) या दोघांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. अनुष्काला अंकिता ठाकूर, गीतांजली मोरे, विशांत ठाकूर, हरिश्चंद्र भालिंगे, दत्तात्रेय टिळेकर यांनी तर आतार व भुजबळ यांना सतीश अधिकारी, नीता कांबळे वैशाली भामे, प्रदीप जगताप यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय सदस्य प्रा. दिगंबर दुर्गाडे, प्रमोद शहा यांनी अभिनंदन केले. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन करून त्यांच्याकडून या परिक्षेबाबत सराव करून घेतला होता. विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील विद्यार्थ्यांचा अभ्यास घेऊन तयारी केली असल्याचे पर्यवेक्षक बाबासाहेब कुंभार यांनी सांगितले.

Val010p1:

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com