
''सर्वास''ची पाचगणीत जागतिक परिषद
बारामती, ता. १४ : जागतिक शांतता व सौहार्द यासाठी गेल्या ७३ वर्षांपासून कार्यरत असलेले जागतिक संघटन ''सर्वास'' इंटरनॅशनलची जागतिक परिषद पाचगणी येथे २२ ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. सर्वास इंडियाचे प्रमुख बारामतीकर असलेल्या अभय शहा यांनी या बाबत माहिती दिली.
शंभरहून अधिक देशात “सर्वास” च्या शाखा असून प्रत्येक तीन वर्षानंतर जागतिक परिषद आयोजिली जाते. २०१५ मध्ये न्यूझीलंड तर २०१८ मध्ये दक्षिण कोरिया येथे परिषदा पार पडल्या.
सुमारे चाळीस वर्षानंतर भारताला जागतिक परिषद आयोजित संधी प्राप्त होत आहे. २२ ते २८ नोव्हेंबर दरम्यान पाचगणीतील एम. आर. ए. Initiatives of change या संस्थेमध्ये या परिषदेचे आयोजन केले आहे. यामध्ये ७० देशामधून सुमारे २०० सदस्य सहभागी होतील असे “सर्वास” International चे प्रमुख जॉनी सेनेगार (स्वीडन) यांनी सांगितले.
“सर्वास” इंडियाचे प्रमुख अभय शहा (बारामती) हे गेले तीन वर्षांपासून हिरेन गोराडिया (मुंबई) यांचे मदतीने ही परिषद भारतामध्ये व्हावी यासाठी प्रयत्नशील होते, त्याला यश आले आहे. भारतातील सर्व सर्वास सदस्यांच्या मदतीतून ही परिषद उत्तम करण्याचा मानस शहा यांनी व्यक्त केला. त्यासाठी तयारी सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
७० वर्षांपूर्वी गुजरातमधील गांधीवादी कार्यकर्ते हरिवल्लभ पारिख यांनी अमेरिकेचे बॉब ल्युथर यांचे आग्रहावरून या संस्थेची स्थापना भारतामध्ये केलेली आहे.
२०१८ व २०१९ मध्ये ''सर्वास'' इंडियाने जागतिक सदस्यांसाठी पुण्यामध्ये गणेश फेस्टिवलचे यशस्वी आयोजन केले होते.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..