प्रा. दुर्गाडे यांना बारा तालुक्यातूंन मोठी आघाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा. दुर्गाडे यांना बारा तालुक्यातूंन मोठी आघाडी
प्रा. दुर्गाडे यांना बारा तालुक्यातूंन मोठी आघाडी

प्रा. दुर्गाडे यांना बारा तालुक्यातूंन मोठी आघाडी

sakal_logo
By

वाल्हे, ता. ११ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ‘ड’ वर्ग मतदारसंघातून प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी भाजपचे उमेदवार दादासाहेब फराटे यांचा तब्बल ६८४ मतांनी पराभव केला. त्यांना शिरूर वगळत सर्वच तालुक्यांतून मोठी आघाडी मिळाली.
पुणे जिल्हा बॅंकेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपने उमेदवार उतरविल्यामुळे मोठा अटीतटीचा सामना रंगला होता. त्यातच अनेक मंत्री व आमदार यांच्या जागा बिनविरोध सुटल्या होत्या. मात्र, प्रा. दुर्गाडे यांना मात्र निवडणूक लढवावी लागणार होती. दादासाहेब फराटे हे त्यांच्यासमोर नवखे उमेदवार होते. मात्र, जिल्ह्यातील भाजपचे वर्चस्व असलेला पुणे, पिंपरी चिंचवड, हवेली येथून फराटे यांना ताकद मिळणार असल्याने दुर्गाडे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे या लढतीकडे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे मोठी रस्सीखेच निर्माण झाली होती.
या निवडणुकीमध्ये १२९३ पैकी ९४८ मते दुर्गाडे यांना मिळाली आहेत. यामध्ये त्यांनी ६८४ मतांचे मताधिक्क्य घेऊन जिल्हा बॅंकेतील आपली जागा पक्की केली. याबाबत ते म्हणाले, ‘‘वाल्ह्यासारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील माझ्यासारख्या व्यक्तीला ड वर्गातून उमेदवारी जाहीर झाली. या वर्गामधून निवडणूक लढविण्याचा अनुभव नसल्याने मनामध्ये चिंता होती. पवार कुटुंबीयांच्या पाठिंब्यावर आणि पक्षाच्या व कार्यकर्त्यांच्या नियोजनबद्ध कामामुळे हे यश मिळाले. पक्षातील कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने घरचा डबा घेऊन प्रत्येक मतदारांपर्यंत पोचण्यासाठी घेतलेल्या कष्टांचा हा विजय आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये माझ्यासाठी मेहनत घेतली. त्यामुळेच प्रतिस्पर्धी उमेदवारावर तब्बल ६८४ मतांचे घेऊ शकलो.’’

दुर्गाडे व फराटे यांना तालुकानिहाय मिळालेली मते
तालुका दिगंबर दुर्गाडे दादासाहेब फराटे
आंबेगाव ५० ७
बारामती २४४ ५७
भोर ३९ ७
दौंड ५८ २३
हवेली २२० ३६
इंदापूर ६८ ४१
जुन्नर ५५ १३
खेड ३९ १२
मावळ ३४ ३
मुळशी १३ २
पुरंदर ७८ ३
शिरूर ४२ ५९
वेल्हे ८ १
एकूण ९४८ २६४

Val०१०p२
दिगंबर दुर्गाडे

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top