शिरूरच्या महिलांचा ‘सुगरण’ला उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरच्या महिलांचा ‘सुगरण’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिरूरच्या महिलांचा ‘सुगरण’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरूरच्या महिलांचा ‘सुगरण’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

शिरूर, ता. ११ : ‘सकाळ’च्या सुगरण स्पर्धेला शिरूर शहर व परिसरातील महिला वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धा काळात काही महिला भगिनींनी या सदरात प्रसिद्ध होणाऱ्या पाककृती व इतर आहार; तसेच आरोग्यविषयक माहितींची कात्रणे काढून त्याचे बुकलेट तयार केले. काहींनी फायलींमधून या माहितीपूर्ण कात्रणांच्या फाईल्स तयार केल्या.
या स्पर्धेतील सहभागी महिला भगिनींना "सकाळ'' च्या वतीने हमखास बक्षिसाची भेट म्हणून स्टील बॉटल भेट देण्यात आली. या स्पर्धेचे शिरूरमधील प्रायोजक ‘धरमचंद भवरीलाल सराफ ॲण्ड ज्वेलर्स’चे मालक व रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक धरमचंद फुलफगर यांच्या हस्ते ही भेट महिला भगिनींना देण्यात आली. राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या आदर्श शिक्षिका बेबीनंदा सकट, कर्डेलवाडी (ता. शिरूर) येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय सकट, ‘सकाळ’चे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक योगेश निगडे, अखिल मुंबई बाजार मित्र मंडळाच्या अध्यक्षा प्रिया रुणवाल आदी यावेळी उपस्थित होते. ‘सकाळ’चे बातमीदार नितीन बारवकर यांनी स्वागत; तर ‘सकाळ’चे वितरण सहव्यवस्थापक गणेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. सहव्यवस्थापक नीलेश देशमुख यांनी आभार मानले.
PNE22S34607

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top