बारामतीत वक्तृत्व, पोस्टर मेकिंग स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत वक्तृत्व, पोस्टर मेकिंग स्पर्धा
बारामतीत वक्तृत्व, पोस्टर मेकिंग स्पर्धा

बारामतीत वक्तृत्व, पोस्टर मेकिंग स्पर्धा

sakal_logo
By

बारामती, ता. २४ ः येथील विद्या प्रतिष्ठान इंग्रजी माध्यम शाळेत (सीबीएसई) जागतिक इंग्रजी दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले. विल्यम शेक्सपिअर इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध कवी, नाटककार आहेत. नाटके व काव्ये इंग्लिश साहित्यात अजरामर करणाऱ्या शेक्सपिअर यांचा वाढदिवस ‘जागतिक इंग्रजी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त प्राथमिक तसेच माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी गोष्टी कथन, गायन, चित्रकला, वक्तृत्व, पोस्टर मेकिंग इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयावर वक्तृत्व तसेच नाटिका सादर केली. यावेळी शाळेच्या प्राचार्या राधा कोरे यांच्या हस्ते शेक्सपिअर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीसे देण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व इंग्रजी विषय शिक्षकांचे सहकार्य केले.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top