बारामती बसस्थानकावरून महिलेचे मंगळसूत्र चोरीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती बसस्थानकावरून महिलेचे मंगळसूत्र चोरीला
बारामती बसस्थानकावरून महिलेचे मंगळसूत्र चोरीला

बारामती बसस्थानकावरून महिलेचे मंगळसूत्र चोरीला

sakal_logo
By

बारामती, ता. २४ : बस स्थानकात बस पकडत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. शहर पोलिस ठाण्यात कलावती पांडुरंग माने (रा. पाहुणेवाडी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली. शनिवारी (ता. २४) दुपारी ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. बारामतीच्या नवीन बस स्थानक इमारतीचे काम सध्या सुरु असल्याने जुन्या कार्यशाळेच्या जागेतून एसटी बस सोडल्या जात आहेत. या ठिकाणी अपुरी जागा असल्याने आणि सध्या एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरु झालेली असल्याने यात्रा-जत्रांच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी होत आहे. त्यातून चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top