
बारामतीत तरुणांकडे सापडला धारदार कोयता
बारामती, ता. २४ : जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून फरारी आरोपी पकडण्याची मोहीम सुरु आहे. शहरातील जळोची भागात दोन तरुण संशयितांकडे पोलिसांना पिशवीत गुंडाळलेला धारदार कोयता मिळाला. याप्रकरणी दोघांविरोधात पोलिसांनी शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.
अक्षय अमित पवार (वय २२, रा. कांबळेश्वर, ता. फलटण, जि. सातारा) व करण तुकाराम गदाई (वय २३, रा. सोमवार पेठ, फिरंगाई मंदिराजवळ, फलटण) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस नाईक स्वप्नील अहिवळे यांनी फिर्याद दिली. २२ एप्रिल रोजी संध्याकाळी भिगवण रस्त्याजवळील जेबीएस टाऊनशीपजवळ ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फरार आरोपींचा शोध घेत असताना एका विना क्रमांकाच्या दुचाकीवरून दोघे संशयितरित्या फिरताना त्यांना दिसले. पोलिसांनी त्यांना इकडे येण्याचे कारण विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देवू लागले. पोलिसांनी त्यांच्याकडील पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये धारदार कोयता होता. कोयत्याबाबतही त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. पोलिसाांनी त्यांच्याकडील विना क्रमांकाची स्कूटर जप्त केली.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..