बारापाटी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कॅनडातून पोहण्याचे साहित्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारापाटी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कॅनडातून पोहण्याचे साहित्य
बारापाटी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कॅनडातून पोहण्याचे साहित्य

बारापाटी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कॅनडातून पोहण्याचे साहित्य

sakal_logo
By

चास, ता. १२ ः कमान (ता. खेड) गावच्या बारापाटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या आत्मनिर्भर विद्यार्थी या पोहण्याच्या नावीन्यपूर्ण व अभिनव उपक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्लोबल स्वीमिंग टीचर्स क्लब कॅनडा या आंतरराष्ट्रीय समूहातील सदस्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वीमिंग सूट, लाइफ जॅकेट्स व स्वीमिंग गॉगल्स दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आता सुरक्षित व सुलभपणे पोहण्याचे कसब आत्मसात करत आहेत.
ग्लोबल स्वीमिंग टीचर्स क्लब कॅनडा या समूहातील जागतिक स्तरावरील जलतरण मार्गदर्शक लॉरे डेस्रोशर्स यांनी शाळेतील शिक्षक संजय नाईकरे यांच्या विनंतीवरून सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वीमिंग सूट, लाइफ जॅकेट्स व स्वीमिंग गॉगल्स पाठवून दिले होते, याचे पार्सल नुकतेच शाळेच्या ताब्यात मिळाले.
लॉकडाउनच्या कालावधीत शाळेचे मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासासोबत पोहणे हा अभिनव उपक्रम राबवून बारापाटी परिसरातील पालकांच्या सहकार्याने आपल्या शाळेतील बहुतेक सर्वच विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे पोहायला शिकवले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे, केंद्र प्रमुख एकनाथ लांघी यांनी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व बारापाटी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. मुलांप्रमाणे मुलींना सुद्धा जीवनावश्यक सर्व कौशल्ये शिकण्यासाठी आवर्जून संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, असे मत सहशिक्षिका वैशाली मुके नाईकरे यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top