आखरवाडी येथील प्रलंबित रस्त्याचा प्रश्‍न मार्गी

आखरवाडी येथील प्रलंबित रस्त्याचा प्रश्‍न मार्गी

चास, ता. १२ ः आखरवाडी (ता. खेड) येथील पाटीलवस्तीकडे जाणारा मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर नुकतेच शिरूर-भिमाशंकर राज्यमार्गाला काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून वरील मार्ग जोडला गेला असून त्याची पाहणी नुकतीच राष्ट्रवादी लीगल सेलचे तालुका अध्यक्ष अॅड. अरुण मुळूक, सरपंच मोनिका मुळूक व अन्य नागरिकांनी करून रस्त्याच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
आखरवाडी गावांतर्गत पाटीलवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचे बरेच वर्षांपासून प्रलंबित असलेले काम राष्ट्रवादी लीगल सेलचे तालुका अध्यक्ष अॅड. अरुण मुळूक यांच्या प्रयत्नातून मार्गी लागले असून खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या सुमारे अठरा लाख रुपये विशेष निधीतून रस्त्याचे काम पूर्ण झाले असून दर्जेदार झालेल्या कामामुळे गेली कित्येक वर्षांपासून नागरिकांची रस्त्याची असलेली मागणी पूर्ण झाली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर झालेल्या कामाची पाहणी मोनिका मुळूक, अॅड. अरुण मुळूक, ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ मुळूक, नीलमताई मुळूक, अशोक मुळूक, ज्ञानेश्वर मुळूक (गुरुजी), विलास मुळूक, रंगनाथ मुळूक, शिवाजी मुळूक, दिगंबर मुळूक, आरुष मुळूक यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com