ज्ञानेश्‍वर कोबल अध्यक्षपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्ञानेश्‍वर कोबल अध्यक्षपदी
ज्ञानेश्‍वर कोबल अध्यक्षपदी

ज्ञानेश्‍वर कोबल अध्यक्षपदी

sakal_logo
By

चास, ता. ९ : आदर्शगाव कान्हेवाडी बुद्रुक (ता. खेड) येथील शिवकृपा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर गंगाराम कोबल यांची तर उपाध्यक्षपदी बाजीराव नथू कोबल यांची बिनविरोध निवड झाली.
सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी व ग्रामस्थांनी एकमताने सोसायटीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर कोबल यांची तर उपाध्यक्षपदी बाजीराव कोबल यांची निवड केली. सहायक निबंधक हरिश्चंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एच. जी. लादे तर सहायक म्हणून सचिव उल्हास देवदरे यांनी काम पाहिले. निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी सरपंच बी. डी. कोबल, माजी अध्यक्ष महेंद्रकुमार थोरात, ए. पी. कोबल, दत्तात्रेय कोबल, शांताराम कोबल, मारुती सहाणे, मंगेश कोबल, कांताराम सहाणे, सदानंद नाईकडे यांनी मोलाचे योगदान दिले. यावेळी नवनिर्वाचित सदस्य बबन सीताराम रूके, आनंदराव कोबल, बाळासाहेब कोबल, बाळशिराम कोबल, रामदास निमसे, धोंडिभाऊ सहाणे, गणपत पवार, कांताबाई कोबल, बेबी मेदगे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top