‘स्टार प्रिसिजन्स’मध्ये रक्तदान शिबिर
चाकण, ता. १० ः औद्योगिक वसाहतीतील स्टार प्रिसिजन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगारांनी कंपनीचे मालक दिवंगत राजीव शहा यांच्या दहाव्या पुण्यस्मरणा निमित्त कंपनीतील चाळीस कामगारांनी रक्तदान करून मालकांच्या स्मृती जागविल्या.
दिवंगत शहा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कंपनीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कोरोनाच्या साथीत कामगारांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून कोरोना रुग्णांना तसेच इतरांना रक्त मिळावे यासाठी एक प्रयत्न केला आहे, असे कंपनीचे व्यवस्थापक नितीन शहा, कंपनीचे अधिकारी सूर्यकांत कुंभार यांनी सांगितले. रक्तदान शिबिराचे आयोजन स्टारवेज कंपनीच्या वतीने तसेच रेड प्लस ब्लड बॅंक, भोसरी यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन कंपनीचे व्यवस्थापक नितीन शहा यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान केलेल्या कामगारांना प्रमाणपत्र व हेल्मेट देण्यात आले. या प्रसंगी प्रमोद पाटील, प्रवीण सावंत, सूरज घोडके, चंद्रकांत सानप, संजय मुदकन्ना, सोमनाथ यादव, नितीन नेहे, परेश गावडे, सुनील जोशी, रवी शर्मा, राजू आळसे, महेश पाटील, कैलास बनकर, लक्ष्मण चेबाळे, सुधाकर पाटील, स्वप्नील इंगवले, प्रवीण कुंभार, रोहीत पटेल आदी उपस्थित होते.
34256
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.