मेदनकरवाडीत निबंध स्पर्धेत सातशे विद्यार्थ्यांचा सहभाग

मेदनकरवाडीत निबंध स्पर्धेत सातशे विद्यार्थ्यांचा सहभाग

चाकण, ता. १० : मेदनकरवाडी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्यावतीने बालिका दिनानिमित्ताने विविध स्पर्धांचे जिल्हा परिषदेची मराठी शाळा, कन्या विद्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे सातशे विद्यार्थी, विद्यार्थिनींनी निबंध स्पर्धेत सहभाग घेतल्याची माहिती सरपंच अमोल साळवे, ग्रामविकास अधिकारी राजाराम रणपिसे यांनी दिली.
मेदनकरवाडी, वैदवाडी व कन्या विद्यालय या शाळांत लहान, मध्यम, मोठा गट यामध्ये विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत माझी वसुंधरा, प्लास्टिक बंदी काळाची गरज, झाडे लावा झाडे जगवा, जलसंधारणाचे महत्त्व, स्वच्छ व सुंदर परिसर, टाकाऊपासून टिकाऊ, सौर ऊर्जा, हवा, शौचालयाचे महत्त्व, हागणदारी मुक्त गाव असे निबंधाचे विषय ठेवण्यात आले होते. निबंध, रांगोळी, चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी ग्रामविकास अधिकारी राजाराम रणपिसे यांनी माझी वसुंधरा अभियानाची तसेच विविध उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी स्पर्धा प्रमुख म्हणून उपसरपंच सलोनी मेदनकर, ग्रामपंचायत सदस्या मंगल मेदनकर, पल्लवी भुजबळ, परिक्षक म्हणून बाळासाहेब पिंगळे, मेघा देशमुख, जयश्री पिंगळे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढण्यात आले. विजेत्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने बक्षीसे देण्यात येणार आहेत. यावेळी सरपंच अमोल साळवे, उपसरपंच सलोनी मेदनकर, ग्रामविकास अधिकारी राजाराम रणपिसे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मेदनकर, संजय वाघमारे, स्वाती गवते, जयश्री भुजबळ, सिंधू मेदनकर, सुमन खरात, संभाजी मेदनकर, संकेत मेदनकर, सुरेखा मेदनकर, अजित मेदनकर, मंगल मेदनकर, विजय मेदनकर, पल्लवी भुजबळ, निलम मेदनकर, गणेश भुजबळ, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संदीप मेदनकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री बेदरकर, वैदवाडीचे शाळाप्रमुख जनाजी भांगे, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली झगडे, तुकाराम कुटे सर्व शिक्षक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक तुकाराम कुटे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.


मेदनकरवाडी (ता. खेड) : बालिका दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांना ग्रामविकास अधिकारी राजाराम रणपिसे यांनी मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com