भिगवण येथे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव

भिगवण येथे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव

भिगवण, ता. १३ : येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक; तर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला.
भिगवण (ता. इंदापूर) येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने दौंड, इंदापूर व बारामती तालुक्यातील १६ विद्यालयांमध्ये पत्रकार दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेतल्या होत्या. त्यातील विजेत्यांना पारितोषिक वितरण व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सन्मानपत्र प्रदान येथील तारादेवी लॉन्स येथे झाला. अध्यक्षस्थानी भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार हे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डी. एन. जगताप, कर्मयोगी कारखान्याचे संचालक पराग जाधव, सरपंच तानाजी वायसे, शंकरराव गायकवाड, संपत बंडगर, संजय रायसोनी, सचिन बोगावत, विजय सोनवणे, सुरेश पिसाळ, तुषार क्षीरसागर आदी उपस्थित होते.
यावेळी लहान गट व मोठ्या गटातील ३२ विद्यार्थ्यांना चषक व प्रमाणपत्र देण्यात आले; तर पत्रकारितेतील योगदानाबद्दल तानाजी काळे, ग्राहक संरक्षणातील योगदानाबद्दल अॅड. तुषार झेंडे पाटील, व्यसनमुक्तीतील कार्याबद्दल रमेश शितोळे-देशमुख यांना; तर सामाजिक योगदानाबद्दल रोटरी क्लब ऑफ भिगवण, भिगवण सायकल क्लब व नेचर फाउंडेशन या संस्थांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला.
डॉ. प्रशांत चवरे यांनी प्रास्ताविक; तर नवनाथ सावंत व सागर जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. विजयकुमार गायकवाड यांनी आभार मानले.
३४९८८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com