तमाशा पुन्हा सुरू करण्यास परवानगी द्या

तमाशा पुन्हा सुरू करण्यास परवानगी द्या

चाकण, ता. १२ ः गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे तमाशाचे कार्यक्रम बंद होते. राज्यात गेल्या महिन्यात तमाशाचे कार्यक्रम सुरू करण्याला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी कलाकारांच्या, फडमालकांच्या मागणीनुसार परवानगी दिली. काही दिवस कार्यक्रम सुरू झाले. परंतु, कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने केलेल्या नविन नियमावलीनुसार राज्यातील तमाशा कार्यक्रम पुन्हा बंद झाले आहेत.
तमाशा बंद झाल्याने कलाकारांनी, फडमालकांनी काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. कलाकार दोन वर्षे होरपळलेला आहे. त्यामुळे मायबाप तुम्हीच आहात. मंत्री साहेब, राज्यात तमाशाला परवानगी द्या हात जोडून तुम्हाला विनंती आहे, अशी मागणी निवेदनाद्‍वारे आज सुप्रसिध्द तमाशा कलावंत, फडमालक मंगला बनसोडे, नितीनकुमार बनसोडे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्याकडे केली आहे.
राज्यात नवीन नियमावलीनुसार नाट्यगृह, चित्रपटगृहात पन्नास टक्के उपस्थितीला परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे तमाशा लोककलेला पन्नास टक्के उपस्थितीची परवानगी द्यावी. राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी या तमाशा लोककलेला बंदी आणली आहे. तालुका पोलिस ठाणे व स्थानिक पोलिस ठाणे तमाशाच्या कार्यक्रमाला परवानगी देत नाही. त्यामुळे राज्यात तमाशाचे कार्यक्रम बंद आहेत. यामुळे राज्यातील तमाशा कलेवर अवलंबून असणारा कलावंत, कामगार, फडमालक आर्थिक विवंचनेने होरपळणार आहे. तमाशा कला जगविण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी अशी कलावंत, फड मालक यांची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com