जमिनी खरेदी फसवणूकप्रकरणी ५ जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जमिनी खरेदी फसवणूकप्रकरणी ५ जणांना अटक
जमिनी खरेदी फसवणूकप्रकरणी ५ जणांना अटक

जमिनी खरेदी फसवणूकप्रकरणी ५ जणांना अटक

sakal_logo
By

भोर, ता. १५ : एकसारख्या नावाचा फायदा घेऊन जमिनीचे खरेदीखत केल्याप्रकरणी भोर पोलिसांनी ५ जणांना अटक केली. तर मुख्य आरोपी फरार झाला आहे. जमीन खरेदी करणारे तुषार विलास हजारे (वय ३०, मुंढवा, पुणे), साक्षीदार तेजस आदिनाथ चोरघे (रा. रहाटवडे, ता. हवेली जि. पुणे), सागर रामचंद्र पालवे (रा. रांझे, ता. भोर) आणि ओळख देणार निकेश भाऊसाहेब चव्हाण (वय- २९ रा. कात्रज पुणे) व संतोष कैलास चोपडे (वय- २३, रा. हडपसर पुणे) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. जमीन विक्री करणारा मुख्य आरोपी हनुमंतराव ज्ञानोबा शिंदे (वय ७१ रा. मुंढवा पुणे) हा फरार झाला आहे.
याबाबत भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंतराव ज्ञानोबा शिंदे (वय. ७१, रा. पिंपळे गुरव पुणे) यांनी याबाबत भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. हनुमंत शिंदे यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या रांझे (ता. भोर) येथील ७५ गुंठे जमिनीचे भोरमधील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत करण्यात आले. २७ सप्टेंबर २०२१ रोजी १२ लाख ५० हजार रुपयांच्या किंमतीच्या झालेल्या खरेदीखताची कॉपी काढल्यानंतर त्यांनी १२ ऑक्टोबर २०२१ रोजी भोर पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी जमिनीचे खरेदीखत लिहून देणार अज्ञात व्यक्ती आणि लिहून घेणार तुषार विलास हजारे याच्या सहित वरील पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास करून पोलिसांनी बुधवारी (ता. १२) रात्री पाच आरोपींना अटक केली. तर हनुमंतराव शिंदे फरार झाला. भोरचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे पुढील तपास करीत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top