पुरंदर तालुक्यामध्ये जल्लोष

पुरंदर तालुक्यामध्ये जल्लोष

वाल्हे, ता. १५ : पुणे जिल्हा बॅंकेच्या चाव्या अखेर प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे या अर्थशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या ‘मास्तरांच्या’ हाती सोपविल्या आहेत. त्यांनी बँकेवर निवडून येण्याची हॅटट्रीक केली होती. आता अध्यक्षपदी तिसऱ्यांदा प्राप्त केले आहे. त्यांचे अध्यक्षपद पुन्हा एकदा पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादीला आणि सोसायट्यांना बळकटी देणारे ठरणार आहे. यामुळे तालुक्यात जल्लोषाचे वातावरण आहे.
विविध घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळून कारभार गतिमान व पारदर्शक केला होता. मागील पंचवार्षिक काळात नोटबंदीच्या काळात जिल्हा बॅंकेचे केंद्रशासनाकडे अडकलेले कोट्यवधी रुपये परत आणण्यामध्ये प्रा. दुर्गाडे यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका त्याचबरोबर जिल्ह्यातील ‘ड’ वर्ग मतदार संघातील मतदारांनी तब्बल ९४८ मतांचा त्यांच्यावर दाखवलेला विश्वास त्यांना जिल्हा बॅंकेच्या अध्यक्ष पदावर बसविण्यासाठी प्रभावी ठरला.
जिल्हा बॅंकेच्या २१ संचालकांपैकी १९ संचालक हे राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे निवडणूक आले. तर १ भाजप व १ अपक्ष संचालकांच्या माध्यमातून भाजपचा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत चंचुप्रवेश झाला आहे. त्यामुळे या बॅंकेच्या कारभारात कुठे ना कुठे या संचालकाच्या माध्यमातून भाजपचे वरिष्ठ नेते लक्ष ठेवणार असल्याने बॅंकेच्या अध्यक्षपदावर अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्ती असणे गरजेचे होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बॅंकेच्या चाव्या आज पुन्हा एकदा दुर्गाडे यांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी प्रा. डॉ. दुर्गाडे यांचे नाव घोषित झाल्यानंतर वाल्ह्यामध्ये फटाके फोडून गुलालाची मुक्त उधळण करत जल्लोष करून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी गोरख कदम, दीपक पवार, सुभाष दुर्गाडे, सूर्यकांत भुजबळ, तुषार भुजबळ, संदीप भुजबळ, संदीप पवार, संतोष भुजबळ आदी उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री अजितदादांनी सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी कायमच प्रयत्न केला आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीचे निर्णय नेहमीच दादांनी घेतले असून ते मी यशस्वीरीत्या पार पाडले आहेत. आजचा हा विजय म्हणजे साहेब, दादा व ताई यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचा आणि माझ्यावर विश्वास दाखविलेल्या मतदार, कार्यकर्ते
आणि जिल्हा बॅंकेच्या ग्राहकांचा आहे.
-प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, नवनिर्वाचित अध्यक्ष, पुणे जिल्हा बॅंक

३५८१२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com