आळंदे सोसायटीची निवडणूक बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदे सोसायटीची निवडणूक बिनविरोध
आळंदे सोसायटीची निवडणूक बिनविरोध

आळंदे सोसायटीची निवडणूक बिनविरोध

sakal_logo
By

भोर, ता. २८ : आळंदे ग्रामपंचायतीमधील विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. ग्रामस्थांनी सोसायटीच्या ७३ वर्षांच्या बिनविरोध निवडीची परंपरा कायम ठेवली आहे. आळंदे येथे सोसायटीच्या यावर्षीच्या झालेल्या निवडणूकीसाठी अनिल घायाळ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी सोसायटीचे सचिव दशरथ पांगारे आदी उपस्थित होते. या निवडणुकीत किशोर बांदल, गोपाळराव राजेशिर्के, दशरथ बांदल, काशिनाथ नांदे, प्रकाश बाठे, दिनकर काकडे, गुलाब कान्हाळे, बाबूराव बांदल व नरसिंग बांदल यांची बिनविरोध निवड झाली तर मुक्ताबाई खोपडे व निलम नांदे यांची महिला प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी यादवराव बांदल, दिलीप बांदल व बळिराम किन्हाळे यांनी प्रयत्न केले. यावर्षीही सोसायटीच्या अध्यक्षपदाची व उपाध्यक्षपदाची निवड ही बिनविरोध करणार असल्याचे किशोर बांदल यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..