
राजा रघुनाथराव विद्यालयास माजी विद्यार्थ्यांकडून मदत
भोर, ता. २४ ः येथील भोर एज्युकेशन सोसायटीच्या राजा रघुनाथराव विद्यालयास दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी इमारतीच्या बांधकामासाठी १ लाख ५ हजार रुपये दिले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या हस्ते भोर एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे मदतीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.
विद्यालयातील सन २०००च्या बॅचमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन विद्यालयात मागील महिन्यात पार पडले होते. त्यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयास आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार माजी विद्यार्थ्यांनी इमारतीच्या बांधकामासाठी सिमेंटच्या ३०० पोत्यांसाठी १ लाख ५ हजार रुपये दिले. यावेळी भोर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद गुजर, उपाध्यक्ष डॉ. सुरेश गोरेगावकर, सचिव विकास मांढरे, सदस्य सुरेश शाह, गजानन झगडे, डॉ. अण्णासाहेब बिराजदार, भजनशेठ गुप्ता, विद्यालयाचे प्राचार्य दीपक शिवतरे, नारायण वाघ आदींसह शिक्षक उपस्थित होते.
या उपक्रमासाठी माजी विद्यार्थी विनोद बोडके, आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर घोडेकर, सागर सोंडकर, डॉ. कमलेश धुमाळ, ऋषिकेश कोळकर, प्रशांत धरू, डॉ. मंदार कट्टे, रिजवान शेख, अंकुर जेधे, डॉ. नितीन सूर्यवंशी, मानसी जोशी, गौरी सोनटक्के, रेश्मा अहिरे, माधुरी ठुबे, डॉ. ज्योती बरकडे, अजित कंक, विशाल यादव, वीरेंद्र शिंदे, डॉ. जयदीप आवारे, गायत्री देशपांडे, विदुला फडणीस आदींनी विशेष प्रयत्न केले.
५९२१२
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..