वरवंड येथे उड्डाणपुलाला दुसऱ्या मोरीची मागणी
वरवंड, ता. २४ ः वरवंड (ता.दौंड) येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उदघाटन व भूमिपूजन नुकतेच झाले. यावेळी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता महामार्गाच्या उड्डाणपुलाला दुसरी मोरी करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली.
सिद्धार्थनगर येथे बहुउद्देशीय इमारत बांधकाम व सभामंडपाचे उदघाटन व कौठीचा मळा भागातील सव्वीस फाटा व धोंडदादा वस्ती या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन खासदार सुप्रिया सुळे व माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती सारीका पानसरे,जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष राहुल दिवेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण सातपुते, वीरधवल जगदाळे, राणी शेळके, योगिनी दिवेकर, सरपंच मीना दिवेकर, उपसरपंच बाळासाहेब जगताप, प्रदिप दिवेकर,अर्चना रणधीर, रोहीदास रणधीर, किशोर दिवेकर आदी उपस्थित होते.
पाटस ग्रामपंचायत येथे सुळे यांनी भेट देवून कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी पाटस येथे ग्रामसचिवालय तसेच इतर विकासकामांच्या मागण्या ग्रामस्थांनी मांडल्या.यावेळी सरपंच अवंतिका शितोळे, सत्वशील शितोळे, प्रशांत शितोळे, सारिका पानसरे,आशा शितोळे, नितीन शितोळे आदी उपस्थित होते.
PNE22S59264
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.