geranium agriculture
geranium agriculturesakal

जिरेनियम शेतीतून साडेतीन लाखांचे उत्पन्न

पारंपरिक पद्धतीला फाटा देत कमी कष्टात आधुनिक शेतीच्या जोरावर लाखोंचा फायदा मिळविण्याकडे सध्याच्या प्रगतशील शेतकरी वळत आहे.
Summary

पारंपरिक पद्धतीला फाटा देत कमी कष्टात आधुनिक शेतीच्या जोरावर लाखोंचा फायदा मिळविण्याकडे सध्याच्या प्रगतशील शेतकरी वळत आहे.

वाल्हे - पारंपरिक पद्धतीला फाटा देत कमी कष्टात आधुनिक शेतीच्या जोरावर लाखोंचा फायदा मिळविण्याकडे सध्याच्या प्रगतशील शेतकरी वळत आहे. याचेच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाल्हे (ता.पुरंदर) जवळील माळवाडी येथील उच्चशिक्षित तरुण शेतकरी सुनील भुजबळ व राहुल विष्णू भुजबळ. त्यांनी केवळ सव्वा एकरांमध्ये नावीन्यपूर्ण जिरेनियम या औषधी वनस्पतीची लागवडीचा पहिलाच प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. या जिरेनियमला सध्या बाजारातून प्रचंड मागणी आहे.

वाल्हे परिसरात जिरेनियम शेतीतून भुजबळ बंधूंनी सुमारे साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळवून इतरांसमोर नफा देणाऱ्या शेतीचा आदर्श ठेवला आहे. राहुल भुजबळ हे उच्चशिक्षित असून ते सध्या वाघळवाडी (ता.बारामती) येथे अध्यपनाचे कार्य करतात. तर सुनील हे नोकरी करत शेतीला प्राधान्य देत आहेत. या भावंडांनी आपल्या शिक्षणाद्वारे आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने पारंपरिक शेतीला फाटा देत आपल्या शेतात बाजारात प्रचंड मागणी असलेल्या सुगंधी वनस्पती जिरेनियमची लागवड केली.

जिरेनियम ही एक सुगंधी व औषधी वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्ष उत्पादन मिळते. हे पीक एका वर्षात तीन ते चार वेळा कापणीला येते. एकरी सुरूवातीला खर्च ७० ते ८० हजार येतो. इतर पिकाच्या तुलनेत पाणी कमी लागते. रोगांचा प्रादुर्भाव अत्यंत कमी, फवारणी व खते यांचा खर्च कमी आहे. या पिकापासून ऑइल निर्मिती केली जाते. कापणीनंतर उरलेल्या पालापाचोळ्यापासून खत निर्मिती केली जाते. या वनस्पतीला भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

- राहुल विष्णू भुजबळ

यासाठी उपयोग

  • हायडेनसी परफ्युम व कॉस्मेटिक

  • परफ्युममधील नॅचरिलीटी मिळते

  • सौंदर्य प्रसाधने

  • साबण अगरबत्ती

  • अत्तर परफ्युम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com