कॉम्प्रेसरच्या स्फोटात तीन कामगार जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉम्प्रेसरच्या स्फोटात 
तीन कामगार जखमी
कॉम्प्रेसरच्या स्फोटात तीन कामगार जखमी

कॉम्प्रेसरच्या स्फोटात तीन कामगार जखमी

sakal_logo
By

चाकण, ता. ३० : पुणे-नाशिक महामार्गावरील मेदनकरवाडी (ता. खेड) येथील ‘सोकीन इलेक्ट्रिकल अॅन्ड इंजिनिअरिंग वर्क्स’ या कंपनीत मंगळवारी (ता. ३०) दुपारी तीनच्या सुमारास कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने तीन कामगार गंभीर भाजले. त्यांच्यावर भोसरी येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिली.
या दुर्घटनेत वीरेंद्र बनवारी यादव (वय 28), अक्षय भीमराव केदारे (वय 27), शिवाजी निलकंठअप्पा मठपती (वय 38, सर्व सध्या रा. सोकीन इलेक्ट्रिकल अॅन्ड इंजिनिअरिंग वर्क्स, चौधरीकाटा, मेदनकरवाडी) हे कामगार जखमी झाले. याबाबतची फिर्याद डॉ. प्रतिभा बर्ण हॉस्पिटल भोसरी यांच्यावतीने पोलिसात देण्यात आली आहे. यादव हा एैंशी टक्के, केदारे हा साठ टक्के, मठपती हा पंच्च्याण्णव टक्के भाजला आहे. तीनही कामगार गंभीर भाजले आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..