
आंबेठाण येथे विकास सोसायटीचे कार्यालय सुरू
आंबेठाण, ता.३० : आजपर्यंत चाकण येथे सुरू असणारे आंबेठाण (ता.खेड) विकास सोसायटीचे कार्यालय आंबेठाण गावात सुरू झाले आहे. गावातच कार्यालय सुरू झाल्याने आंबेठाण, वराळे आणि बोरदरा गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
येथील ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलात असणाऱ्या गाळ्यात हे कार्यालय सुरू झाले आहे. यासाठी ग्रामपंचायतीने खुर्च्या, टेबल उपलब्ध करून दिले आहे. याप्रसंगी सोसायटी अध्यक्ष दत्तात्रेय चव्हाण, उपाध्यक्ष रूपेश बुट्टेपाटील, सरपंच संघमित्रा नाईकनवरे, उपसरपंच ज्योती मांडेकर, संचालक दत्तात्रेय पडवळ, अशोक मांडेकर, संतोष मांडेकर, बबन घाटे, धोंडिबा पडवळ, गीताबाई मांडेकर, इंदूबाई पडवळ, दत्तात्रेय मांडेकर, सुभाष मांडेकर, शांताराम चव्हाण, तृप्ती मांडेकर, रूपाली गोणते, तुळसाबाई घाटे, ज्ञानेश्वर घाटे, ज्ञानेश्वर चव्हाण, ग्रामसेवक रवींद्र उगले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
आभार उपाध्यक्ष रूपेश बुट्टेपाटील यांनी मानले.
02500