Sat, April 1, 2023

सावरदरीच्या उपसरपंचपदी नीता शेटे
सावरदरीच्या उपसरपंचपदी नीता शेटे
Published on : 4 March 2023, 9:27 am
आंबेठाण, ता. ४ : सावरदरी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नीता दत्तात्रेय शेटे यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच मीरा अंकुश कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच भरत तरस यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या निवडणुकीमध्ये ही निवड करण्यात आली.
यावेळी माजी उपसरपंच मीरा कदम, संदीप पवार, ताराबाई शेटे, बारकाबाई गावडे, संदीप मेंगळे हे ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रशासकीय कामकाज ग्रामसेवक श्रीधर नाईकडे यांनी पाहिले.