देशमुखवाडी येथे पाणीयोजना, साकव पुलाचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशमुखवाडी येथे पाणीयोजना,
साकव पुलाचे भूमिपूजन
देशमुखवाडी येथे पाणीयोजना, साकव पुलाचे भूमिपूजन

देशमुखवाडी येथे पाणीयोजना, साकव पुलाचे भूमिपूजन

sakal_logo
By

आंबेठाण, ता. ७ : जलजीवन योजनेचे काम पूर्ण देशात सुरू आहे. जलजीवन योजना होत असताना त्यात बारकाईने लक्ष देऊन काम करून घ्यावे. कारण पुढील ३० वर्ष यासाठी निधी मिळणार नाही, अशी माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी दिली.
देशमुखवाडी (ता. खेड) येथे जिल्हा वार्षिक योजनेच्या साकव कार्यक्रम निधीतून देशमुखवाडी-खरमारवाडी रस्त्यावर स्मशानभूमीजवळ ६० लाख रुपयांच्या साकव पुलाचे भूमिपूजन आणि जलजीवन मिशन अंतर्गत ८६ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
बुट्टे पाटील म्हणाले, ‘‘जलजीवन योजनेचे अंदाजपत्रक मराठीत नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे. जेणेकरून ते लोकांना वाचता येईल. नागरिकांनी ठेकेदाराला सहकार्य करावे आणि चांगले काम करून घ्यावे.’’
या प्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती चांगदेव शिवेकर, सरपंच संजय देशमुख, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष काळूराम पिंजण, देवदास बांदल, सुनील देवकर, शांताराम देशमुख, दत्तात्रेय मांडेकर, उपसरपंच भगवान देशमुख, मंगल भालेराव, लक्ष्मीबाई देशमुख, कांचन देशमुख, सुलाबाई बोरकर, गोविंद भालेराव, दादाभाऊ देशमुख, लहू देशमुख, लक्ष्मण देशमुख, भाऊसाहेब देशमुख, किसन नवले, शरद निखाडे, बारकू आवळे, अशोक देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
पाणी योजनेसाठी जागा दान दिल्याबद्दल बाळासाहेब बबन देशमुख यांचा तर साकव पुलासाठी जागा दिल्याबद्दल शांताराम देशमुख, संतोष देशमुख, सुरेश भेगडे, संजय गायकवाड, गोविंद देशमुख, सागर करंजावणे, साहेबराव देशमुख यांचा सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन नाथाभाऊ पिंगळे यांनी केले. तर आभार अश्विन देशमुख यांनी मानले.