शिंदेगावच्या सरपंचपदी संतोष पानमंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदेगावच्या सरपंचपदी संतोष पानमंद
शिंदेगावच्या सरपंचपदी संतोष पानमंद

शिंदेगावच्या सरपंचपदी संतोष पानमंद

sakal_logo
By

आंबेठाण, ता. ८ : दोन ग्रामपंचायत सदस्य अचानक राजकीय सहलीवर गेल्याने चुरशीच्या झालेल्या शिंदेगाव (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संतोष बंडू पानमंद यांची बिनविरोध निवड झाली. सुरवातीला फार चुरशीची वाटणारी ही निवडणूक अखरेच्या टप्प्यात मात्र पूर्णपणे एकतर्फी झाली.
मावळते सरपंच सचिन देवकर यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदासाठी ठरलेल्या मुदतीत संतोष पानमंद यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश सोमवंशी यांनी केली. यावेळी मावळते सरपंच सचिन आनंदा देवकर, संतोष बंडू पानमंद, संगीता विजय केंदळे, प्रकाश दादू मेंगळे, सीताराम सोनबा गायकवाड, माया राजू भांगरे, सायली तुषार टेमगिरे, सोनाली भीमसेन टेमगिरे हे सदस्य हजर होते. तर, सोनाली गणेश पानमंद या मात्र गैरहजर राहिल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चाकणचे मंडलाधिकारी गणेश सोमवंशी यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक अतुल रावते, कर्मचारी अशोक गायकवाड, दीपक गायकवाड यांनी मदत केली. म्हाळुंगे पोलिस ठाण्याच्या वतीने एक पोलिस निरीक्षक, दोन अधिकारी आणि २० जवान यावेळी तैनात केले होते.
दरम्यान, गावातील दोन्ही गटांना तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहरातील काही नेतेमंडळी, जिल्ह्यातील एक माजी मंत्री यांच्या अदृश्य हातांनी पडद्यामागे मदत केल्याचे खासगीत बोलले जात आहे. भाजपच्या दोन गटात अप्रत्यक्षपणे ही निवडणूक झाली. त्यातून भाजपमधील दोन गट यानिमित्ताने समोर आले. तालुक्यात एखाद्या ग्रामपंचायतीसाठी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मी स्व. तानाजी केंदळे यांच्या पॅनेलमधून निवडून आलो आहे. माझ्या विजयासाठी माझ्या पॅनेलचे सर्व कार्यकर्ते आणि नगरसेवक उत्तम केंदळे यांनी मोठे प्रयत्न केले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे काम करणार आहे.
- संतोष पानमंद, नवनिर्वाचित सरपंच, शिंदेगाव (ता. खेड)