उमेदवारांकडून आलेल्या वस्तू अनाथ मुलांना भेट

उमेदवारांकडून आलेल्या वस्तू अनाथ मुलांना भेट

आंबेठाण, ता.२ : खेड तालुक्यातील जनतेने बाजार समितीच्या निवडणुकीत सबसे बडा रुपय्या ठरल्याची परिस्थिती अनुभवली. ही सर्व निवडणूक पैशावर झाली असे तालुक्यातील जनता खुलेआम बोलत आहे. पण यात एक सुखद आणि आदर्श घालून देणारी घटना कोरेगाव बुद्रुक (ता.खेड) येथे घडली आहे. मतदान करण्यासाठी उमेदवाराने दिलेली रक्कम तसेच भेटवस्तू कोरेगाव बुद्रुक येथील कामिनी अर्जुन गोगावले या महिला ग्रामपंचायत सदस्याने अनाथ आश्रमातील मुलांच्या दैनंदिन खर्चासाठी दिली आहे.
गोगावले यांचे पती अर्जुन गोगावले यांनी देखील यापूर्वी गावचे सरपंच म्हणून काम पाहिले आहे. खेड तालुक्यात नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून मतदार असलेल्या गोगावले यांना वेगवेगळ्या उमेदवारांची मिळून रोख स्वरूपात २८ हजार आणि ३५ हजार रुपयांची बंद पाकिटे आणि काही भेटवस्तू आल्या होत्या. परंतु गोगावले यांनी ही ३५ हजार रुपयांची पाकिटे संबंधित जवळच्या उमेदवारांना तात्काळ साभार परत केली आणि उर्वरित २८ हजारांची पाकिटे ठाकूर पिंपरी येथील अनाथ आश्रमातील मुलांच्या दैनंदिन खर्चासाठी दिली. विशेष म्हणजे ज्यांनी ही पाकिटे ज्या उमेदवारांच्या प्रतिनिधीने दिली त्यांच्याच नावाने पैसे दान केल्याची पावती केली असून, ही पावती संबंधित उमेदवारांना पाठविणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले.
ही सर्व पाकिटे गोगावले यांनी आश्रमात गेल्यावर मुलांसमोर उघडली.याशिवाय मतदारांना आलेल्या वस्तुरूपी भेटवस्तू देखील यावेळी आश्रमात देण्यात आल्या. तसेच स्वखर्चाने यावेळी या मुलांना खाऊ वाटप देखील केला आहे. यामुळे कामिनी गोगावले यांनी एक वेगळा आदर्श समाजात निर्माण केला आहे

02612

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com