बोरदरा ग्रामपंचायतीच्या 
उपसरपंचपदी आशा काळे

बोरदरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आशा काळे

आंबेठाण, ता. ६ : बोरदरा (ता.खेड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आशा नवनाथ काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळत्या उपसरपंच योगिता अरुण पडवळ यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. यावेळी सभागृहात सरपंच किरण पडवळ, मावळत्या उपसरपंच योगिता पडवळ, रोहिणी पडवळ, विशाल पडवळ, सुरेश पडवळ, दत्तात्रेय पडवळ, कृष्णाबाई पडवळ, संदीप साळुंके हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच किरण पडवळ हे होते. उपसरपंचपदासाठी आशा काळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच किरण पडवळ यांनी केली. प्रशासकीय कामकाज ग्रामसेवक योगेश कानडे यांनी पाहिले.

निवडीनंतर बबन पडवळ, हिरामण पडवळ, कान्हू पडवळ, कविता पडवळ, सुरेश पडवळ, बाळासाहेब पडवळ, जालिंदर पडवळ, दीपक पडवळ, सुभाष काळे, बाळासाहेब काळे, माजी चेअरमन नवनाथ काळे, अरुण पडवळ, मनोरमा पडवळ, मंगल पडवळ, पुष्पा पडवळ आदींच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच आशा काळे यांचा सत्कार करण्यात आला.

आशा काळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com