बोरदरा येथील वेदांत पडवळचे थायबॉक्सिंग-वूशो स्पर्धेतील यश
आंबेठाण, ता. २५ : बोरदरा (ता. खेड) येथील वेदांत पडवळ याने थायबॉक्सिंग व वूशो स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. वेदांत पडवळ हा वाई येथील सेंट थॉमस हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. आठवीत शिकणाऱ्या पडवळ याने शिरवळ येथील वूशो स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात तिसरा क्रमांक मिळवीत ब्रॉंझ मेडल पटकाविले. तर खराडी येथे पार पडलेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत ब्रॉंझ मेडल मिळविले. शिवाय, सातारा येथील शाहू स्टेडिअम येथे पार पडलेल्या किक बॉक्सिंगमध्ये १४ वर्षाखालील ६४ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले.
नेवासा येथील त्रिमूर्ती पब्लिक स्कूलमध्ये पार पडलेल्या थायबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात वेदांत याने सुवर्णपदक मिळविले. राज्यभरातील जवळपास ४०० स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. वेदांतने हैदराबाद येथे पार पडलेल्या थायबॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल पटकाविले आहे. पडवळ याच्या यशाबद्दल बोरदरा ग्रामस्थ व नातेवाइकांनी त्याचा सन्मान केला.
त्याच्या या यशाबद्दल माजी सभापती भगवान पोखरकर, सरपंच किरण पडवळ, जालिंदर राऊत, बबन पडवळ, विठ्ठल थोरात, बाबाजी गुंड, राहुल हुंडारे, उल्हास पानमंद आदींनी त्याचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.