शिंदेगाव शाळेत इंटरॲक्टिव्ह बोर्डचे लोकार्पण

शिंदेगाव शाळेत इंटरॲक्टिव्ह बोर्डचे लोकार्पण
Published on

आंबेठाण, ता.३ : शिंदेगाव (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या केंद्र शाळेत बसविण्यात आलेल्या इंटरऍक्टिव्ह बोर्ड आणि लर्निंग संचाचे लोकार्पण सरपंच सायली टेमगिरे यांच्या हस्ते केले.
आधुनिक साधनांचा उपयोग विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी होईल असे मत सरपंच सायली टेमगिरे यांनी व्यक्त केले.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून येथील जिल्हा परिषद शाळेला दोन लाख वीस हजार किमतीचा इंटरऍक्टिव्ह बोर्ड आणि लर्निंग संच मंजूर केला आहे.
या संचाचे लोकार्पण सरपंच सायली टेमगिरे, उपसरपंच सोनाली पानमंद, माजी उपसरपंच सोनाली टेमगिरे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष सुनील देवकर, माजी सरपंच शिवाजी माताळे, सुनील घनवट, तुषार टेमगिरे, निवृत्त सैनिक दत्तात्रेय टेमगिरे, अशोक गायकवाड, नारायण बोरकर, सुनीता बुरगे, सुवर्णा भुजबळ, भारती चौरे, अनिल नाईकरे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.