कामगार कल्याण मंडळाच्या 
वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

Published on

आंबेठाण, ता. ८ : वराळे (ता. खेड) येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त चाकण भागातील विविध कंपन्यांमधील कामगार व संस्कार प्रतिष्ठानच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आंबा, जांभूळ, चिंच, वड, पिंपळ अशी जवळपास ४०० झाडे लावण्यात आली.
यावेळी कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे, सुजाता इळवे, प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील, चाकण कामगार कल्याण केंद्राचे अविनाश राऊत, वनरक्षक सागर चव्हाण, ओम पवार, राँस प्रोसेसिंगचे गौरव गुरव, गोविंद तालिमकर, मोहन गायकवाड, संदीप गावडे, केंद्र संचालक प्रदीप बोरसे, अनिल कारळे, अरुण वाडकर, शंकर नाणेकर, अण्णा जोगदंड, काळूराम लांडगे, महंमद शफी मुलाणी, मिथुन पाटील, राजगुरुनगर कामगार कृती समितीचे सदाशिव आमराळे, दत्तात्रेय दगडे, प्रकाश पटारे, दीपक निकुमे, गोकूळ भामरे, बापू पाटील, राहुल देवरे, शशिकांत धनगर, नितीन पाटील, संदीप सूर्यवंशी, कृष्णदेव थोरात, ज्ञानेश्वर कळमकर व दत्तात्रेय धावडे उपस्थित होते.
‘‘महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त पंधरा दिवसात राज्यभरात वृक्षारोपण मोहीम राबवली जात आहे. शासकीय विभाग एकत्र आले तर त्याचा फायदा जनतेला होतो. कामगारांची सामाजिक बांधिलकी ही अभिमानाची बाब आहे. लावलेली झाडे जगवण्यासाठी या परिसरातील कंपन्यांनी झाडे दत्तक घेतली पाहिजेत’’, अशी भावना रविराज इळवे यांनी व्यक्त केली.
यावेळी लॉरियाल, अँसल, सीआयई भोसरी, टाटा मोटर्स, व्हेरॉक, मिंडा, बजाज, स्कोडा कंपनी तसेच विविध कंपन्यांमधील कामगार, युनियन प्रतिनिधी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप बोरसे यांनी तर आभार अविनाश राऊत यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.