चाकण ‘एमआयडीसी’त अवैध व्यवसाय सुरू

चाकण ‘एमआयडीसी’त अवैध व्यवसाय सुरू
Published on

आंबेठाण, ता. २८ : चाकण एमआयडीसी सध्या अवैध धंद्यांचे माहेरघर ठरत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या भागात उदरनिर्वाहासाठी येतात. परंतु, यातील अनेक लोक या भागात अवैध धंदे करीत असून त्याच्या माध्यमातून लाखो रुपयांची माया गोळा केली जात आहे. एमआयडीसीत शांतता नांदावी आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी, या उद्देशाने एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण केले. परंतु, याच पोलिस ठाण्याचे या बेकायदेशीर व्यवसायांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले, असून त्यांच्या गप्प असण्याने या अवैध धंद्याला एकप्रकारे पाठबळ मिळत आहे.

चाकण ‘एमआयडीसी’चे खेड तालुक्यात चार टप्पे पूर्ण झाले, असून पाचवा टप्पा संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. सुरुवातीला या भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चाकण पोलिस कार्यरत होते. परंतु, चाकणवरील वाढता ताण पाहता स्वतंत्रपणे म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे सुरू केले. नव्याने आणि स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू झाल्याने या भागातील बेकायदेशीर सुरू असणारे व्यवसाय नियंत्रणात येतील. या भागात सुव्यवस्था राहील, असा कयास होता. परंतु, तो खोटा ठरला असून या भागातील अनैतिक व्यवसाय वाढत आहे.

बाजारपेठा म्हणून पुढे आलेल्या वसुली फाटा, म्हाळुंगे गाव, खालुंब्रे, देहू फाटा आणि येलवाडी परिसर, वाघजाई नगर, निघोजे येथील डोंगरवस्ती भाग आदी भागात अवैध धंद्याचे प्रमाण मोठे आहे. वराळे, वासुली फाटा, एच. पी. चौक, म्हाळुंगे आदी भागांत हा व्यवसाय चालतो.

पोलिस यंत्रणेचा याकडे काणाडोळा
सध्या एमआयडीसी भागात वेश्या व्यवसाय, बेकायदेशीर दारू विक्री, मटका, बेकायदेशीर गॅस भराई आणि विक्री, गुटखा विक्री, अवैध प्रवासी वाहतूक, असे अनेक धंदे मोठ्या प्रमाणात फोफावला आहेत. यापैकी एखाद्या व्यवसायिकावर किरकोळ थातूरमातूर कारवाई करून आम्ही कारवाई करतो, असे चित्र निर्माण केले जात आहे.
परंतु, वास्तवात मात्र पोलिस यंत्रणेचा याकडे पूर्णपणे काणाडोळा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com