कोरेगाव खुर्दच्या ८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

कोरेगाव खुर्दच्या ८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

Published on

आंबेठाण, ता. १५ : कोरेगाव खुर्द (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ८ विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक गुणवत्ता यादीत आणि ३ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीधारक पात्र झाले आहेत. शाळेच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.
शाळेतील २२ विद्यार्थ्यांपैकी दुर्गेश अनिल घनवट, अंकिता संतोष लोंढे, समृद्धी नवनाथ कडूसकर, तन्वी अनिल झांबरे, प्रणाली सतीश कडूसकर, करण संजय जैसवाल, साक्षी नवनाथ मेंगळे, आदेश रामदास मेंगळे या विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत वार्षिक प्रत्येकी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे, तर कार्तिकी सुरेश दोंद, दिव्या प्रकाश म्हसे, समीक्षा केवल बुट्टे या तीन विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती अंतर्गत नववी ते बारावीपर्यंत वार्षिक प्रत्येकी साधारणपणे ९ हजार ६०० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या माध्यमातून त्यांचे उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचे मत केंद्रप्रमुख छाया फल्ले आणि मुख्याध्यापक स्वाती खैरे यांनी व्यक्त केले. या गुणवंत विद्यार्थ्यांना नीता माळशिरसकर-शिरसाट यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, विस्तार अधिकारी राजेंद्र टिळेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंच सीमा झांबरे, राजू झांबरे, विद्या कडूसकर, शाळा समितीचे अध्यक्ष अशोक कडूसकर, मीना गोगावले, नितीन कडूसकर, रमेश दोंद, जया कडूसकर, मधुकर शेळके, किसन गोगावले, किरण झांबरे, उज्ज्वला बगाटे, दिलीप वाळके, पल्लवी अभ्यंकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com