
आंबेठाण,ता.२३ : एक महिन्यांपूर्वी मुसळधार पावसात पडलेली कोरेगाव खुर्द (ता. खेड) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची संरक्षक भिंत पूर्णत्वास आली आहे. जलसंपदा विभागाने अति तातडीच्या कामात याचा समावेश करून हे काम पूर्ण केले आहे, अशी माहिती शाखा अभियंता नीलेश घारे- देशमुख यांनी दिली आहे.
जलसंपदा विभागाच्या बिगर सिंचनमधून २५५ अंतर्गत या कामाला निधी देण्यात आला असून, त्यासाठी जवळपास ३५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. एक महिन्यांपूर्वी अवकाळी पावसाने कोरेगाव खुर्द आणि कोरेगाव बुद्रुक (ता. खेड) या दोन गावांदरम्यान असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची कोरेगाव खुर्द बाजूकडील पूर्वेकडील भिंत कोसळली होती. यामुळे वाहतुकीला आणि बंधाऱ्याला मोठा धोका निर्माण झाला होता. कोरेगाव खुर्द आणि कोरेगाव बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये असणारा हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा जवळपास ४० वर्षांपूर्वी उभारण्यात आला असून, या बंधाऱ्याला २८ गाळे आहेत. चाळीस वर्षांपूर्वी ही पडलेली भिंत उभारली होती. त्यावेळी त्याची उंची २ ते अडीच मीटर होती. सध्या नवीन उभारलेली भिंत ही ९ मीटर उंचीची आहे. यामुळे बंधाऱ्याबरोबर कोरेगाव खुर्द येथील स्मशान भूमीला देखील बळकटी येणार आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातून या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी तत्काळ निधी मिळावा, अशी मागणी या विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी तहसीलदार यांच्याकडे केली होती. तहसीलदार प्रशांत बेडसे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील, भामा आसखेड धरणाचे अधिकारी अश्विन पवार, राजेंद्र झांबरे यांनी तत्काळ या पडलेल्या भिंतीची पाहणी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.