भामा आसखेडमध्ये ५५ टक्के साठा
आंबेठाण, ता. ६ : खेड, शिरूरसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (ता.खेड) धरणात रविवारी (ता. ६) अखेर ५४.२५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा चार पट असून मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात १४.३६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जून पासून ४४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या एकूण ४.६४ टीएमसी पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा हा ४.१६ टीएमसी इतका आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात १४.३६ टक्के म्हणजे १.१० टीएमसी पाणीसाठा होता.
धरणातून पुणे शहराच्या पूर्व भागासह तीर्थक्षेत्र आळंदीला पाणीपुरवठा केला जात आहे. या धरणातून पुढील काळात पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा सुरू होणार आहे.पिंपरी चिंचवड करिता भामा आसखेड धरणातून २.१४ टीएमसी पाणीसाठा देण्यात येणार आहे.
धरणाच्या बुडीत क्षेत्रात पर्यटनाची अनेक ठिकाणे आहेत.सध्या धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. तसेच डोंगरांना देखील पाझर फुटल्याने अनेक ठिकाणी धबधबे सुरू झाले आहेत याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक खेड तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटकांनी या भागात येताना काळजी घ्यावी असे आवाहन सहाय्यक अभियंता (श्रेणी १) अश्विन पवार, कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी केले आहे.
03350
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.