चाकण- वासुली फाटा रस्ता बंद करणार

चाकण- वासुली फाटा रस्ता बंद करणार

Published on

आंबेठाण, ता. १३ : चाकण ते वासुली फाटा (ता. खेड) हा रस्ता बुधवारनंतर (ता. १६) स्थानिक नागरिक गावोगावी बंद करणार आहेत. दररोजची वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर आम्ही आंदोलन करणार असून आमचे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने आहे. चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक दोन बंद पडला तरी चालेल. दररोजच्या वाहतूक कोंडी विरोधात महिला, विद्यार्थी, शेतकरी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. या रस्त्यावरून एमआयडीसीची अवजड वाहतूक होऊ देणार नाही, असा एल्गार चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक दोनमधील नागरिकांनी पुकारला आहे.
दररोजची वाहतूक कोंडी आणि अपघाताला वैतागलेल्या नागरिकांची आंबेठाण (ता. खेड) येथे बैठक झाली. या वेळी नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत सर्वानुमते शरद बुट्टेपाटील यांनी वरील इशारा दिला आहे. या वेळी नागरिकांनी ‘जड वाहतूक बंद करा, नाहीतर एमआयडीसी बंद करा’ अशा घोषणा दिल्या.
याप्रसंगी दिनेश मोहिते पाटील, सुनील देवकर, दत्तात्रेय टेमगिरे, अमोल पानमंद, दिलीप वाळके, अशोक मांडेकर, दत्तात्रेय मांडेकर, काळूराम पिंजण, बाबासाहेब पवार, रवींद्र चव्हाण, दत्तात्रेय गोतारणे, संतोष मांडेकर, शरद मांडेकर, दिनेश लांडगे, गणेश मांडेकर, रोहित डावरे, दत्तात्रेय पडवळ, शिवाजी कावरे, एकनाथ पवार, सुरेश मोहिते, संदीप देशमुख, किरण पडवळ, बाळासाहेब लिंभोरे, पोपट मोहिते, राजू झांबरे, अमोल दवणे, मुकुंद केदारी यांच्यासह आठ ते दहा गावातील नागरिक उपस्थित होते. दत्तात्रेय मांडेकर यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. बाळासाहेब लिंभोरे यांनी आभार मानले.

भ्रष्टाचाराचे एमआयडीसी कार्यालय
एमआयडीसी कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचे कार्यालय आहे. पैसा गोळा करणे हा त्यांचा धंदा आहे आणि त्यांना मुंबईवरून मदत होते. एमआयडीसी बंद पडली तर आर्थिक नुकसान होईल म्हणतात, मग आमच्या लोकांचे जीव महत्त्वाचे नाहीत का, असा सवाल बुट्टेपाटील यांनी उपस्थित केला.

आम्ही भोगायचे किती? आम्हाला चार किलोमीटरसाठी दीड तास वेळ लागतो. शेतमाल वेळेत पोहोचत नाही. एमआयडीसीने त्यांचा स्वतःचा रस्ता सुरू करावा.
- बाबासाहेब पवार, माजी सरपंच, बिरदवडी

टप्पा क्रमांक पाचमध्ये कंपन्या आल्या. पण त्यांना रस्ते केले नाही, ते सर्व जिल्हा परिषदेचा रस्ता वापरतात. रस्ता पूर्ण खराब झाला आहे. आम्ही कधीही आंदोलनाला सहकार्य करण्यास तयार आहे.
- दिनेश मोहिते पाटील, माजी सरपंच, गोनवडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com