आंबेठाणला वीजवाहक केबलचा धोका

आंबेठाणला वीजवाहक केबलचा धोका

Published on

आंबेठाण, ता. ८ : आंबेठाण (ता. खेड) येथील दवणे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेने वीजवितरणची केबल टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, धोकादायक असणारी ही वीज वाहक केबल वरचेवर गाडली जात असल्याने त्यापासून नागरिकांच्या जिवाला धोका आहे.
महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने तत्काळ यामध्ये लक्ष घालून वीजवाहक केबल जास्तीत जास्त खोलीवर कशा गाडल्या जातील याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख आणि आंबेठाणचे माजी सरपंच सुभाष मांडेकर, माजी उपसरपंच भानुदास दवणे यांनी केली आहे. यावेळी अमोल दवणे, बाळासाहेब दवणे, शरद मांडेकर, शांताराम गाडे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
स्थानिक ग्राहकांना या वीजवाहक केबलद्वारे वीजपुरवठा केला जात आहे. मात्र, २२ केव्ही क्षमतेची केबल आवश्यक त्या खोलीवर गाडली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या भागात मोठ्या प्रमाणात जमीन खोदाई किंवा रस्ता दुरुस्तीची कामे सुरू आहेत. जर केबल वरच्या वर गाडली गेली तर भविष्यात खोदाई करताना मोठी दुर्घटना घडू शकते. याशिवाय अगदी डांबरी रस्त्यालगत ही केबल टाकली जात असल्याने रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला जात आहे.

आंबेठाण येथे सुरू असणारे हे केबलचे काम दुरुस्तीचे काम आहे. यापूर्वी असणारी केबल खराब झाल्याने हे दुरुस्तीचे काम सुरू आहे. मी स्वतः जागेवर जाऊन पाहणी केली असून, ज्या ठिकाणी केबल खोल गाडली गेलेली नाही, अशा ठिकाणी पुन्हा उकरून ती केबल खोलवर गाडण्यास सांगितले आहे.
- एस. बी. ढाकणे, सहाय्यक अभियंता, वीजवितरण

03414

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com