वहागावातील शिबिरात १२० जणांची तपासणी
आंबेठाण, ता. ८ : वहागाव (ता. खेड) येथे श्री दत्तगिरी बाबा सामाजिक संस्था आणि प्रवाह एनर्जी वोखार्ड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या आरोग्य शिबिरात देशमुखवाडी, कोळीये, शिवे, वहागाव आदी गावातील १२० पेक्षा जास्त नागरिकांनी आरोग्य तपासणी केली. या कार्यक्रमास संकल्प युवा प्रतिष्ठानचे संस्थापक माणिक भवार, सरपंच सोनल नवले, जानताबाई पोंभाले, किरण नवले, सुनील नवले, कैलास नवले, विशाल जाधव, दिलीप नवले, रामदास नवले, संदीप पानमंद, राहुल नवले, रामदास गायकवाड, मंगेश भवार, गणेश धंद्रे, अक्षय पोंभाले, सूरज शेळके आदी उपस्थित होते. वैद्यकीय पथकात डॉ. अमोल भडेवाड, डॉ. अबिद लांतुरे, तर कंपनीच्यावतीने दत्तात्रेय सबणे, व्यवस्थापक प्रिया श्रीनिवासन आदी उपस्थित होते. यावेळी वोखार्ड फाउंडेशनच्या माध्यमातून गावातील विविध अडचणी सोडविण्यासाठी सीएसआर निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली. शिबिरानंतर कोजागरी पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी हळदी- कुंकू कार्यक्रम घेण्यात आला.