करंजविहिरे येथे तीन घरांना आग

करंजविहिरे येथे तीन घरांना आग

Published on

आंबेठाण, ता. १८ : करंजविहिरे (ता. खेड) येथील तळशेत येथे शॉर्टसर्किटमुळे घरांना लागलेल्या आगीत घरासह आतील साहित्याचे मोठे नुकसान झाले. एकमेकांना लागून तीन कौलारू घरे असल्याने या आगीची झळ तीनही घरांना बसली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली, तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे.
तळशेत वस्ती येथे लक्ष्मी बाळू दिवेकर, मोहन महादू दिवेकर, विठ्ठल गजाबा कोळेकर यांची घरे एकमेकांना लागून आहेत. सकाळच्या सुमारास घरात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. त्यानंतर आग वाढल्याने घरातील गॅस सिलेंडरचा देखील स्फोट झाला. यामध्ये तीनही घरातील सर्व साहित्य खाक झाले आहे. यात महत्वाची कागदपत्रे, काही दागिने, बचत ठेव आणि पोस्टाच्या योजनेची गोळा केलेले पैसे जळाले आहेत. चाकण एमआयडीसी आणि चाकण नगरपरिषद यांच्या अग्निशामक दलाच्या गाड्या आल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. परंतु तोपर्यंत सर्व साहित्य जळाले होते.
‘नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक कशा पद्धतीने मदत करता येईल, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. नागरिकांनी देखील या कुटुंबांना शक्य होईल त्या पद्धतीने मदत करावी. तलाठ्यांसह आम्ही या ठिकाणी उपस्थित राहून पंचानामा करत आहोत,’ असे करंजविहिरे येथील पोलीस पाटील सचिन मरगज यांनी सांगितले.
‘आम्ही आवाहन करून या गरीब कुटुंबाला आधार देऊन तात्पुरती व्यवस्था करणेसाठी ५२ हजार रुपये जागेवर गोळा करून दिले आहेत. यासाठी स्थानिक नागरिकांनीदेखील आर्थिक मदत केली आहे. पुढील आवश्यक कामांसाठी मदत करणार आहे,’ असे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले.

मदतीचे आवाहन
नुकसानग्रस्त अंगणवाडी सेविका लक्ष्मी बाळू दिवेकर (७८२२०५७६०३), मोहन महादू दिवेकर (९११२०५१८२५/ ८६६८९३१८९६), विठ्ठल गजाबा कोळेकर (८१०४७३७५८९) यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com