भामा आसखेडमधून दुसरे आवर्तन

भामा आसखेडमधून दुसरे आवर्तन

Published on

आंबेठाण, ता. १ : भामा आसखेड (ता. खेड) धरणातून या वर्षीच्या रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन आज (ता. १) सोडण्यात आले. धरणाच्या आयसीपीओ मधून ११०० क्यूसेस वेगाने हे पाणी सोडण्यात आले. पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांमधील आणि या पाण्यावर पाणी योजना अवलंबून असणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरेगाव भीमापर्यंत असणारे बंधारे या आवर्तनातून भरले जाणार असल्याने धरण प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. भामा आसखेड धरण हे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भामा नदीवर उभारले असून धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी आहे. सध्या धरणात ८७.५० टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ७०. ३७ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी पुरेसा पाऊस झाल्याने धरण १०० टक्के भरले होते.
बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन सहाय्यक अभियंता (श्रेणी १) अश्विन पवार, शाखा अभियंता शुभम सुसुंद्रे, संदीप भोसले, कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com