धामणेकरांचा खडी क्रशरला विरोधच
आंबेठाण, ता. २० : धामणे (ता. खेड) येथील काही भांडवलदार व्यक्तींकडून जमिनी घेऊन त्यावर खडी क्रशर प्लांट उभा करण्याचे नियोजन आहे. त्याला विरोध म्हणून गावकऱ्यांनी ग्रामसभा घेत तीव्र विरोध केला आणि जर गावात खडी क्रशर प्लांट उभारला गेला तर नागरिक एकमताने रस्त्यावर उतरतील, असा इशारा या ग्रामसभेत दिला.
गावात खडी क्रशर प्लांट उभा करण्याचे नियोजन सुरू असल्याची कुणकुण गावातील लोकांना लागताच ग्रामस्थांनी खडी क्रशर प्लांट होऊ द्यायचा नाही, यासाठी शुक्रवारी (ता. २०) विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर ग्रामपंचायत प्रशासक स्वाती भोईरकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. प्रशासकीय कामकाज ग्रामपंचायत अधिकारी सविता बोरकर यांनी पाहिले. यावेळी उत्तर म्हाळुंगे पोलिस ठाण्याच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता जाधव यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
धामणे गावाच्या हद्दीत होणाऱ्या खडी क्रशरला गावातील महिलांसह ग्रामस्थांनी एकजुटीने कडाडून विरोध केला. खडी क्रशर प्लांटला परवानगी द्यायची नाही, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी खडी क्रशर होऊ नये म्हणून अर्ज दिले आहेत. अर्ज दिलेल्या ग्रामस्थांनी उभे राहून खडी क्रशरला आपला विरोध असल्याचे परखडपणे ग्रामसभेत सांगितले. ग्रामस्थांचा क्रशरला प्रखरपणे विरोध असल्याचा ठराव केला असल्याचे प्रशासक भोईरकर यांनी सांगितले.
या ग्रामसभेला माजी सरपंच अंकुश कोळेकर, पोलिस पाटील मंगेश कोळेकर, महेंद्र कोळेकर, किरण कोळेकर, अंकुश भोकसे, अरुण कांडेकर, गोविंद कोळेकर, समाधान कोळेकर, अरुण करंडे, शांताराम कोळेकर आदी उपस्थित होते.
गावात खडी क्रशर प्लांट सुरू होण्याबाबत माझ्यावर जे आरोप केले गेले, ते तथ्यहीन आहेत. उलट माझादेखील या खडी क्रशर प्लांटला तीव्र विरोध आहे. मी नेहमी ग्रामस्थांबरोबर राहणार आहे.
- महेंद्र कोळेकर, माजी सरपंच, धामणे (ता. खेड)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

